अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील गरुडधाम स्मशानभूमीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
अकोला, 23 एप्रिल : अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील गरुडधाम स्मशानभूमीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. स्मशानभूमी म्हटलं की लोकांच्या डोळ्या पुढे येतं ते प्रेतयात्रा..प्रचंड जनसमुदाय...स्मशान भूमीतील पडकं शेड आणि स्मशान शांतता. मात्र येथील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील स्मशानात आता चक्क वाढदिवस साजरे होत आहेत हे नवलच. येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुनीलकुमार धुरडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन्ही स्मशान भूमीत पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
सध्या ऊन वाढत असल्याने स्मशानभूमीत फिरणाऱ्या पक्षांसाठी त्यांनी विविध ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर स्मशान भूमीत येणाऱ्या लोकांना नियमांचे पालन करावे, याकरिता नियमावलीचे पोस्टर लावण्यात आले. या सुसज्ज फुलांनी नटलेल्या स्मशान भूमीत व निसर्गरम्य वातावरणात श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार सुनिलकुमार धुरडे यांनी पक्षांना पाण्याची व्यवस्था करून दिल्याबद्दल गरुड धाम स्मशान भूमी समितीचे जेष्ठ गणपतराव रौदळे व श्याम कुमार ढाकरे यांच्या हस्ते सुनिलकुमार धुरडे यांचा वाढदिवस स्मशान भूमीत साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच सागर ढगे, सुरेश खोडे, गोपाल व्यास, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र तायडे, गणेश सागुणवेडे, भास्कर दांदळे, पंजाब रौदळे, शालीग्राम झाडोकार, रामचंद्र वाघमारे, महादेव राऊत, नरहरी हागे, गोपाल भड, गजानन मानकर, संतोष झगडे, गणेश बावस्कर, भिमराव पहुरकर, बोडखे भूषण हागे आणि सर्व स्मशान भूमीचे
0 Comments