नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
मुंबई, 22 एप्रिल : कोरोना (Corona) संसर्ग तोडण्यासाठी अखेर 'ब्रेक द चेन' म्हणत राज्यात लॉकडाऊनचा (maharashtra lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारच्य नव्या नियमावलीनुसार, सर्व सामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाही. तसंच, जिल्हाबंदीही घालण्यात आली आहे.
'ब्रेक द चेन' अंतर्गत दि. 22 एप्रिल 2021, रात्री 8 वाजेपासून पासून लागू होणारी सुधारित नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. कोरोना विषाणू फैलाव रोखण्यासाठी आणि संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काही आपत्कालीन पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे. साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील कलम २ आणि आनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी यातून प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण राज्यभर खालील उपाययोजना लागू केल्या जातील. 22 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.
अ) कार्यालयीन उपस्थिती
सर्व सरकारी कार्यालये (राज्य, केंद्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारितील) कोविड-19 व्यवस्थापनाच्या संदर्भातील थेट आपत्कालीन सेवावगळता उर्वरित कर्मचाऱ्यांच्या 18 टक्के उपस्थितीत कामकाज करतील.
1. मंत्रालय तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सरकारी कार्यलयांसंदर्भात महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने विभागप्रमुख 15 टक्क्यांपेक्षा जास्ती कर्मचारी हजेरीबद्दल निर्णय घेऊ शकतील.
2. इतर सरकारी कार्यालयांसदर्भात विभागप्रमुख जास्ती उपस्थितीबद्दलचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणांच्या परवानगीने घेऊ शकतील.
ब) ब्रेक द चेन किंवा संसर्गसाखळी तोडा या शीर्षाखाली यापूर्वी 13 एप्रिल 2021 ला दिलेल्या आदेशातील कलम 5 मधे नमूद केल्यानुसार इतर सर्व कार्यालयांमधे केवळ 15 टक्के कर्मचारी उपस्थिती किंवा एकूण पाच कर्मचारी, यापैकी जे जास्ती असेल त्यात कामकाज करतील.
क) ब्रेक द चेन किंवा संसर्गसाखळी तोडा या शीर्षाखाली दिलेल्या 13 एप्रिल 2021 च्या आदेशांमधील कलम 2 नुसार उल्लेखित सर्व जीवनावश्यक सेवांसाठी लागणाऱ्या कामकाजासाठी किमान कर्मचारी संख्येत काम करावे आणि उपस्तिती कोणत्याही परिस्थितीत 50 टक्क्यांवर जाणार नाही, हे बघावे.
जीवनावश्यक सेवा प्रत्यक्ष पुरवण्याच्या कामी तैनात करण्यात आलेल्या मनुष्यबळासंदर्भात किमान मनुष्यबळ वापरावे पण हे मनुष्यबळ शंभर टक्क्यांपर्यंतही वाढवण्याची मुभा आहे.
विवाह समारंभ
विवाहसमारंभ साजरे करताना ते एकच समारंभ म्हणून एकाच हॉलमधे केले जावेत आणि कमाल दोन तासात हे कार्यक्रम करताना जास्तीत जास्ती 25 व्यक्ती उपस्थित राहू शकतील. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करत असलेल्या कुटुंबांना पन्नास हजार रुपयांचा दंड आकारला जाईल आणि संबंधित हॉल किंवा समारंभस्थळ कोविड-19 ची आपत्ती आहे तोवर बंद केले जाईल.
खासगी प्रवासी वाहतूक
अ) बसगाड्या वगळता इतर खासगी प्रवासीवाहतूक केवळ आपत्कालीन सेवेसाठी वा वैध कारणांसाठी वापरता येईल आणि त्यासाठी चालक अधिक प्रवासी आसनक्षमतेच्या पन्नास टक्के ही कमाल मर्यादा राहील. या प्रवासात आंतर-जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासीवाहतूक अपेक्षित नाही तर प्रवाशांच्या निवासस्थानाच्य
Credit by news18 lokmat
0 Comments