नव्या कोरोना व्हेरियंट B.1.617 (new variant of coronavirus) बद्दल माहिती जमा करण्यात शास्त्रज्ञ व्यग्र आहेत. असं म्हटलं जात आहे, की हा व्हेरियंट अमरावतीमध्ये आढळला आणि फेब्रुवारीमध्ये याचमुळे आसपासच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढली
नागपूर 22 एप्रिल : कोरोना विषाणूची दुसरी लाट (Coronavirus Second Outbreak in India) वेगानं पसरताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ देशात वाढत्या कोरोना प्रकरणांचं कारण समजल्या जाणाऱ्या कोरोना व्हेरियंट B.1.617 (new variant of coronavirus) बद्दल माहिती जमा करण्यात व्यग्र आहेत. असं म्हटलं जात आहे, की हा व्हेरियंट अमरावतीमध्ये आढळला आणि फेब्रुवारीमध्ये याचमुळे आसपासच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढली. ही बाब ठामपणे बोलण्यासाठी आणखी शोध करण्याची गरज आहे. सध्या शास्त्रज्ञांनी या व्हेरियंटबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी विदर्भ गाठलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की हा भारतात निर्माण झालेला व्हेरियंट आहे. याच कारणामुळे आता रिसर्च आणि मीडिया हाऊस विदर्भाकडे वळाले आहेत. यादरम्यान अनेकजण भारतीय व्हेरियंटची माहिती मिळवण्यासाठी नागपुरला पोहोचले आहेत. संसर्गजन्य रोग विशेषतज्ञ डॉक्टर नितीन शिंदे सांगतात, की हा व्हेरियंट ब्रिटन, ब्राझील किंवा आफ्रिकेतील व्हेरियंटच्या तुलनेत वेगळा आहे. याबाबत दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच चर्चा झाली होती.
डॉक्टर शिंदे म्हणाले, की ब्रिटनसह अनेक देशांनी भारतावर प्रवासासाठी बंदी घातली आहे. याच कारण हेच आहे, की B.1.617 हा व्हेरियंट अतिशय वेगानं पसरत आहे. याशिवाय अमरावतीत झपाट्यानं झालेल्या कोरोना प्रसाराचं कारणही हेच मानलं जात आहे. याप्रकरणी अद्याप अजून शोध बाकी आहे. रिपोर्टमधील डेटाच्या हवाल्यानं असं म्हटलं जात आहे, की B.1.617 पहिल्यांदा डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या सॅम्पलमध्ये आढळला होता.
विदर्भाच्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे डॉक्टर अतुल गवांडे अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांच्या कोविड १९ कंट्रोल अॅडवायजरी टीमचे सदस्य होते. त्यांनीदेखील विषाणूच्या या व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू संपूर्ण कुटुंबालाच शिकार बनवत आहे. विशेषतः हे विदर्भात घडताना दिसत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, याचा अर्थ असा होतो, की या विषाणूचा प्रसार अधिक वेगानं होत आहे. हा विषाणू किती घातक आहे, याबाबत अद्याप संशोधन बाकी आहे. संशोधक ग्रेस रॉबर्ट्स यांच्या अभ्यासानुसार नवा व्हेरियंट आधीपेक्षा 20 टक्के अधिक पसरणारा आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयाचं असं म्हणणं आहे, की प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचा संबंध B.1.617 सोबत नाही. तर, एक्सपर्टचं असं म्हणणं आहे, की असं डेटा कमी असल्यामुळे होऊ शकतं
Credit by news18 lokamat
0 Comments