Corona Update : देशात मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येनं गाठला नवा उच्चांक, 2020 जणांचा मृत्यू
मंगळवारी चोवीस तासात तब्बल 2,94,115 जणांना कोरोनाची लागण (Corona Cases in India) झाल्याचं समोर आलं आहे. तर, वर्ल्डोमीटरनुसार, मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत देशात 2020 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली 21 एप्रिल : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत(Corona Cases in India) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशात आता मंगळवारचे आकडे (Corona Update) चिंतेत आणखीच भर घालणारे आहेत. मंगळवारी देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इतकंच नाही तर मृतांच्या आकड्यानंही उच्चांक गाठला आहे. मंगळवारी चोवीस तासात तब्बल 2,94,115 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर, वर्ल्डोमीटरनुसार, मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत देशात 2020 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत नोंदवली गेलेली ही सर्वाधिक संख्या आहे. पहिल्यांदाच देशात 2 हजारहून अधिक लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.
मागील सलग पाच दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात भलतीच वाढ नोंदवली जात आहे. आता कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या 1,82,570 इतकी झाली आहे. तर, आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या 1,56,09,004 झाली आहे. देशात सध्या 21,50,119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे रुग्ण देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या 13.8 टक्के आहेत.
Credit by news18 lokamat
0 Comments